गणेशभक्तांसाठी दिवा, पेण येथे गणपती स्पेशल थांबणार

अविरत वाटचाल न्यू

मुंबई, 13 ऑगस्च 2018:

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या काही गणपती विशेष गाड्यांना दिवा आणि पेण स्थानकात थांबा देण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. 

 

दिवा स्थानकात थांबणाऱ्या गाड्या

  1. गाडी क्रमांक 01001 आणि 01007 सीएसएमटी- सावंतवाडी विशेष गाडी मध्यरात्री 1.4 ला दिवा स्थानकात पोहोचेल आणि 1.6 ला सुटेल.
  2. गाडी क्रमांक 01002 आणि 01008 सावंतवाडी-सीएसएमटी विशेष गाडी मध्यरात्री 2.25 ला दिवा स्थानकात येईल आणि 2.27 ला सुटेल.

 

पेण स्थानकात थांबणाऱ्या गाड्या

  1. गाडी क्रमांक 01033 सीएसएमटी – रत्नागिरी विशेष गाडी दुपारी 2.18 ला पेण येथे थांबेल आणि 2.19 ला सुटेल.
  2. गाडी क्रमांक 01034 रत्नागिरी – पनवेल विशेष गाडी पहाटे 6.13 ला पेण स्थानकात थांबेल आणि 6.14 ला सुटेल.
  3.  गाडी क्रमांक 01035 पनवेल-सावंतवाडी विशेष गाडी सकाळी 8.31 ला पेण येथे थांबेल आणि 8.32 ला सुटेल.
  4. गाडी क्रमांक 01036 सावंतवाडी रोड-सीएसएमटी विशेष गाडी सकाळी 9.30 ला पेण येथे थांबेल आणि 9.31 ला सुटेल.
  5. गाडी क्रमांक 01435 पनवेल-सावंतवाडी रोड विशेष गाडी रात्री 11.21 ला पेण स्थानकात थांबेल आणि 11.22 ला सुटेल.
  6. गाडी क्रमांक 01436 सावंतवाडी रोड-पनवेल विशेष गाडी संध्याकाळी 7.30 ला पेण येथे थांबेल आणि 7.31 ला सुटेल.
  7. गाडी क्रमांक 01449 पनवेल-रत्नागिरी विशेष गाडी रात्री 11.18 ला पेण येथे थांबेल आणि 11.19 ला सुटेल.
  8. गाडी क्रमांक 01450 रत्नागिरी-पुणे विशेष गाडी सायंकाळी 7.28 ला पणे येथे थांबेल आणि 7.19 ला सुटेल.

=============================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी 6 गाड्या
    https://goo.gl/F3pv1B

 

  • हरभऱ्याच्या पानांची चुलीवरची गावरान भाजी