सीवूड्स मध्ये पाम ट्री च्या रोपणाला विरोध

  • भारतीय झाडे लावाण्याची मनसेची मागणी

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 1 ऑक्टोबर 2018:

सुशोभीकरणाच्या निमित्ताने नवी मुंबई महापालिकेने सेक्टर48 येथे पाम झाडाचे मुळासकट रोपण केले आहे. महापालिकेने केलेल्या या रोपणाला नागरिकांनी  विरोध केला आहे. या पामच्या झाडांऐवजी परिसरात सावली देणा-या भारतीय झाडे लावावीत अशी मागणी मनसेचे नवी मुंबई शहर सहसचिव सचिन कदम यांनी महापालिका उद्यान उपायुकत्त नितीन काळे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सीवूड्स, सेक्टर – ४८ येथे महानगरपालिकेतर्फे नवीन झालेल्या महानगरपालिका शाळेजवळ पूर्ण वाढलेले पाम झाडाचे मुळासकट रोपण करण्यात आले. तसेच सुशोभीकरणाच्या निमित्ताने महानगरपालिका अजून हि झाडे प्रभागात लावणार आहे. मुळात पाम झाड हे वाळवंटी भागातील आहे. त्याचे विशेष पर्यावरणीय महत्व  नाही. हे झाड केवळ शोभेचे मानले जाते.

मे २०१६ पूर्वी अशाच प्रकारे एन. आर. आय कॉम्प्लेक्स जवळ रोपण केलेली ४० हुन अधिक झाडे सुकली होती.तरी महानगरपालिका हि झाडे सेक्टर-४८ येथे का लावते हा प्रश्नच आहे, असे मत विभागअध्यक्ष अमोल आयवळे यांनी व्यक्त केले. भारतीय झाडे हि शुद्ध हवा, सावली देतात. त्याचप्रमाणे पक्षी अशा झाडांवर घरटे हि बंधू शकतात. असा कोणताही फायदा पाम झाडामुळे होत नाही. त्यामुळे उद्यान विभागाने भारतीय झाडेच लावावीत आणि पाम झाडे लावणे बंद करावे. अन्यथा मनसेला आंदोलन करावे लागेल असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

=======================================================================================================================

 

इतर बातम्यांचाही मागोवा 

  • पामबीचवर गाड्यांचा वेग मंदावला