भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना वाढीव मालमत्ता कर, मागील थकबाकीबाबत दिलासा द्या

नवी मुंबई भाजप युवा नेता  निशांत करसन यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 17 जून 2021

नवी मुंबई महापालिका हद्दीत भूमीपुत्रांकडून गरजेपोटी बांधलेल्या वाढीव बांधकामांना लागू केलेल्या वाढीव मालमत्ता कर तसेच मागील थकबाकी आणि त्यावरील तिप्पट दंडाच्या रक्कमेबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे युवा नेते निशांत भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. निशांत भगत यांनी नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांची भेट घेवून त्याबाबतचे निवेदन दिले आहे.

युवा नेते निशांत भगत यांनी सांगितले की, नवी मुंबई शहरातील भूमिपुत्रांनी मूळ गावात व गावठाण विभागात गरजेपोटी घरेही वाढत्या कुटुंबाच्या संख्येमुळे घरे अपुरी पडत असल्याकारणाने बांधली तसेच सन 1970 ते सन 1990 अगोदर ची रहाते घर पडायला आली होती ती पुनर्निर्मित करायची वेळ ही भूमिपुत्रांवर आली व ती विकसित करण्यात आली आहेत .त्याच दरम्यान काही विकसित होत असताना अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून अनाधिकृत बांधकाम धारकांची यादी जाहीर करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून कोर्टात गेले .परिणामी कोर्टाने मालमत्ता कर विभागाला कर वसुली करण्याच्या सूचना देण्यात आल्या अशा त्या चुकीच्या पद्धतीने पाठवण्यात आल्या असल्याचा दावा करण्यात आला अनेकांचे बांधकाम चालू असताना क्षेत्रफल मोज माप न करताच अंदाजीत लावण्यात आले आहे .तसेच मागील थकबाकी वर तीन पट दंड आकारण्यात आले आहे व वाढीव मालमत्ता कराच्या दराबाबत 29 गावातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती देण्यात आली .

  • Other Video on You Tube

ते पुढे म्हणाले की , नवी मुंबई शहरातील भूमिपुत्रांना न्याय देण्याची भूमिका आमदार गणेश नाईक यांनी घेतली व मागील 25 वर्ष मालमत्ता कराच्या दरामध्ये वाढ केली नाही .सद्यस्थितीत कोरोनाच्या काळात ग्रामस्थांचे आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. तरी आपण वाढीव मालमत्ता कर ज्या बांधकाम धारकांना नोटीस देन्यात आली आहे त्यांची सुनावणी घेवुन भूमिपुत्रांच्या घरांची माहिती जमा करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून समजून घेऊन दिलासा देण्याची सूचना केली .तो पर्यंत आपण भूमिपुत्रांना गरजेपोटी बांधलेल्या घरांना वाढीव मालमत्ता कराबाबत वितरीत केलेल्या देयकाना स्थगिती देऊन दिलासा द्यावा,अशी विनंती निशांत भगत यांनी प्रशासनाकडे केली आहे.

  • Other Video on You Tube

========================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप