एनएमएमटीला UMI-2018  पुरस्कार

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 30 ऑक्टोबर 2018:

नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाने इंटिग्रेटेड इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टम अर्थात आयआयटीएमएस या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी केल्याची दखल घेत भारत सरकारच्या गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयाने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास सन 2018 करिता सार्वजनिक परिवहन क्षेत्रातील मानाचा “UMI-2018 Awards for Commendable Initiative in Urban Transport” जाहीर केला आहे. 04 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक परिवहन विषयक नवीन उपक्रमासंदर्भात चिटणवीस सेंटर, नागपूर, येथे आयोजित 11 व्या अर्बन मोबलिटी इंडिया  कॉन्फरन्स या कार्यक्रमात उर्जा मंत्री (नवीन व नवीकरणीय  ऊर्जा), महाराष्ट्र राज्य व इतर मान्यवर यांचे हस्ते नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास वर्ष 2018 चा IITMS क्षेत्रातील उल्लेखनीय पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.एन.रामास्वामी यांनी दिली.

हा पुरस्कार  “बेस्ट इंटलिजीन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टम प्रोजेक्ट ” या श्रेणीतील प्रथम क्रमांकाचा असून याबाबत व्ही. एस. पांडे, संचालक, गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालय, भारत सरकार यांचे अधिकृत पत्र एम.एम.एम.टी. उपक्रमाला मिळाले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने “ (IITMS) “ प्रणाली अंतर्गत उपक्रमाची 03 बस आगारे व 15 नियंत्रण कक्षाचे संपूर्ण संगणकीकरण केले असून सीबीडी-बेलापूर येथील मुख्यालयात अत्याधुनिक व सुसज्ज अशा स्वतंत्र मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची उभारणी केली आहे. मध्यवर्ती नियंत्रण कक्षास 03 बस आगारे व 15 नियंत्रण कक्ष जोडण्यात आले असून संपूर्ण वाहतूकीचे ऑनलाईन दैनंदिन कामकाज करण्यात येत आहे.

उपक्रमाने प्रवासी हा केंद्रबिंदू मानून व नवी मुंबई शहरातील बस स्थानके व मुख्य बस थांब्यावर प्रवाशांना मार्गदर्शक ठरतील असे PIS व LED TV बसविले आहेत. याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी NMMT Bus Tracker हा स्वतंत्र मोबाईल ॲप कार्यान्वित केला असून याव्दारे प्रवाशांना बसच्या अचूक वेळेची माहिती, येणारी बस कोणत्या बस थांब्यावर आहे, WhatsApp आणि SMS व्दारे प्रवासाची माहिती व बस मार्गाची माहिती तसेच बस आगमनाचा अलार्म या सारख्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. तसेच या मोबाईल ॲपव्दारे तिकीट, पास काढणे, डिजीटल पेमेंटच्या दृष्टीने स्मार्ट कार्डव्दारे तिकीट उपलब्ध करून देणे इत्यादी सुविधा आगामी काळात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ.एन.रामास्वामी यांनी सांगितले. याबरोबरच या प्रणालीव्दारे चालक, वाहक कर्मचाऱ्यांवर अंकुश राहणार असून वेगात अथवा हळू बसेस चालविणारे, प्रवासी थांब्यावर असताना बस न थांबविणारे चालक/वाहक यांची अचूक माहिती परिवहन प्रशासनास प्राप्त होत असून अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

======================================================================================================================================

इतर बातम्यांचाही आढावा

  • नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांची विशेष मुलाखत