श्री मांढरदेवी काळूबाई सेवाभावी सामाजिक संस्था तर्फे गरजूंना अन्नदान

गेल्या सव्वादोन महिन्यांपासून तुर्भे मध्ये अविरत उपक्रम
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
    नवी मुंबई,13 जुलै 2020

कोरोना संकट काळात कामधंदा हिरावला गेल्याने आर्थिक टंचाईमुळे दोन वेळच्या अन्नाची भ्रांत झालेल्या गोरगरीब मजुरांच्या पोटाची भूक भागविण्याचे काम तुर्भे गावातील श्री मांढरदेवी काळूबाई सेवाभावी सामाजिक संस्था ९ एप्रिल २०२० पासून रोज अन्नदान करुन अविरतपणे करीत आहे.

कोरोना संकटाच्या पाश्वभूमीवर भारत देशात ‘कोरोना’चा संसर्ग वाढू लागल्याने केंद्र शासनाने २५ मार्च २०२० पासून टाळेबंदी (लाँकडाऊन) घोषित केली. या टाळेबंदीने हातावर पोट असणारे गोरगरीब, मजूर, छोटे व्यवसायिक वर्गाचे संसार पूर्णपणे उध्वस्त झाले. हाताला काम न मिळणाऱ्या गोरगरीब मजुरांना दोन वेळच्या जेवणाची चिंता सतावू लागली. या विवंचनेत पडलेल्या तुर्भे परिसरातील शेकडो गोरगरीब मजुरांना, तुर्भे गावातील नेहमी सामाजिक कार्यात अग्रभागी असणार्‍या ‘श्री मांढरदेवी काळूबाई सेवाभावी सामाजिक संस्था’ने मायेचा ओलावा देतानाच त्यांच्या जेवणाचा प्रश्नही सोडविला आहे.

गरजूंना अन्नदान करण्यासाठी लागणारे जेवण बनवण्यासाठी तसेच जेवण वाटप करण्यासाठी ‘श्री मांढरदेवी काळूबाई सेवाभावी सामाजिक संस्था’चे संस्थापक-अध्यक्ष सुनील तुकाराम पाटील यांना तुर्भे मधील केसरीनाथ घरत, साईनाथ पुंडलिक पाटील, अनिल तुकाराम पाटील, उमेश घरत, कृष्णा अवधूत काकड, रोहन चिंतामन म्हात्रे, प्रकाश पंडित पाटील, हेमंत भोईर, सागर पाटील, वेंकेटेश राव, अक्षय शाम पाटील, रितिक बबन पाटील, किरण रायते, प्रथम भालचंद्र भोईर, अभिषेक भोईर, अँड. बिपीन घरत, साईनाथ बुवा पाटील,  साईनाथ तामसे यांचे नियमित सहकार्य लाभते.
तुर्भे गावातील दानशूर ग्रामस्थ आणि रहिवाशांनी खूप मोठया प्रमाणात सर्व प्रकारची मदत संस्थेला केल्याने संस्था आज पर्यंत गोरगरीब जनतेला अन्नदान करु शकली आहे. असे संस्थेचे अध्यक्ष सुनील तुकाराम पाटील यांनी सांगितले.

===============================

  • इतर बातम्यांचाही मागोवा