मॉरिशसच्या मराठी कलाकारांचा ठाण्यात रंगणार नाट्यप्रयोग

अविरत वाटचाल न्यूज नेटनवर्क

ठाणे, 5 एप्रिल २०१९:

मॉरिशसमध्ये मराठी सांस्कृतिक केंद्र उभारून नाट्य  चळवळ उभी करणाऱ्या मॉरिशसवासीयांचे ‘दत्तक ‘हे नाटक ठाणेकरांच्या भेटीला येत आहे. शुक्रवार,12 एप्रिल रोजी दुपारी 4.30 वाजता ठाण्यातील काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर येथे या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. ठाणेकर रसिकांनी या नाटकाचा उपस्थित राहून मॉरिशसच्या मराठी कलाकारांना प्रोत्साहित करावे असे आवाहन मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष अर्जुन पूतलाजी व अपूर्वा प्रोडक्शनचे अध्यक्ष सुमुख वर्तक यांनी केले आहे.

  • मॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने मराठी नाटक महोत्सव आयोजित केला जात आहे. मॉरिशसमध्ये स्थायिक असणारे हे मराठी कलाकार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून सांस्कृतिक क्षेत्रात आपले वेगळेपण दाखविणाऱ्या अपूर्वा प्रोडक्शन या सांस्कृतिक संस्थेने खास ठाणेकर रसिकांसाठी ‘दत्तक’चा खास प्रयोग विनामुल्य आयोजित केला आहे.
  • मॉरिशसमध्ये विविध क्षेत्रात मराठी बांधव आपला वेगळा ठसा उमटवत आहे .यामध्ये वैद्यकीय,अभियांत्रिकी,कायदा,अभिनय,राजकारण, प्रशासन या सर्वच क्षेत्रात ते अग्रेसर आहेत. मॉरिशसच्या विकासातील आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात मराठी बांधवांचे योगदान महत्वपूर्ण  आहे.
मॉरिशस येथे नाट्यप्रेमीच्या कौतुकास पात्र ठरलेल्या रत्नाबाई लक्ष्मण लिखित ‘दत्तक’ या नाटकाने मॉरिशसमधील ४२ व्या मराठी नाट्यमहोत्सवात प्रथम क्रमांक मिळवून सर्वोत्कृष्ट नाटक, दिग्दर्शन, सर्वश्रेष्ठ स्थानिक नाटककार व बालकलाकार यांच्यासह एकूण सहा पारितोषिके पटकाविली आहेत.

===================================================

इतर बातम्यांचाही मागोवा