प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी २४ जुलैपर्यंत अर्ज करा

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
ठाणे, ४ जुलै २०१९:

खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना अर्थिक आधार मिळावा याकरिता प्रधानमंत्री पीक योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.कोकण विभागातील शेतकऱ्यांना शासनाकडून नियुक्त भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत पिक विमा उतरविता येणार आहे.हंगामात पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा हप्ता थेट कपात करण्यात येणार आहे. येत्या २४ जुलैपर्यंत हे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पीक विम्यासाठी अर्ज सादर करताना बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा,पीक पेरा पत्र,आधार कार्ड,भाडेपटटा करार असल्यास करारनामा,बॅक पासबुक प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे.

  • कोकणात भात पिकाकरिता विमा संरक्षित रक्कम रु.४३,५०० प्रति हेक्टर व भरावयाचा विमा हप्ता रु ८७० प्रति हेक्टर,नाचणी पिकाकरीता विमा संरक्षित रक्कम रु २०,००० प्रति हेक्टर व भरावयाचा विमा हप्ता रु.४०० प्रति हेक्टर,उडीद पिकाकरिता विमा संरक्षित रु १९,००० प्रति हेक्टर व भरावयाचा विमा हप्ता रु.३८० प्रति हेक्टर या प्रमाणे निश्चित करण्यात आला आहे.शेतकरी जवळच्या बॅकेमार्फत तसेच तालुका व गाव पातळीवर सुरु केलेल्या आपले सरकार-जनसुविधा केंद्रामार्फत पीक विम्याचे अर्ज ऑनलाइन पध्दतीने भरु शकतात.त्याच बरोबर शेतकरी शासनाच्या पीक विमा संकेतस्थळावरुन व विमा कंपनीच्या संकेतस्थळावरुन वैयक्तिकरित्याही योजनेत सहभागी होऊ शकतात.अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

======================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा