पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २० जून २०२०

लहान मुलगी घरात रडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनआरआय पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी एका घराचे बंद दरवाजा फोडून बेडरुममध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला वाचविल्याची खळबळजनक घटना उलवे परिसरात उघडकीस आली आहे. लहान मुलीच्या रडण्याच्या आवाजानंतर शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि पोलीस तसेच फायर ब्रिगेडच्या जवानांच्या एका महिलेचे प्राण वाचले.

अविरत वाटचाल: पेज लाइक करा. शेअर करा. सबस्र्काइब करा.
https://bit.ly/2YOQrZf

१८ जून रोजी उलवे सेक्टर ५ येथील एका इमारतीमध्ये लहान मुलगी रडत असून दरवाजा बंद असल्याचा मेसेज एनआरआय पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस नाईक किरण स्वार आणि पोलीस शिपाई पांडुरंग कवठे यांना पोलीस नियंत्रण कक्षातून देण्यात आला. बीट मार्शल यांनी तातडीने हा निरोप उलवे अग्निशमन विभागाला दिला आणि लगेचच बीट मार्शल त्याठिकाणी रवाना झाले. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं खरोखर दरवाजा आतून बंद होता आणि मुलीचा रडण्याचा आवाज जोरजोरात येत होता. अग्निशमन दलाचे कासकर, राकेश सरोदे, कासकर यांनी घराचा दरवाजा तोडला आणि आतमध्ये गेले. दरासमोर अवघी चार वर्षाची चिमुरडी रडत उभी होती.

अविरत वाटचाल : पेज लाइक करा. सबस्क्राइब करा. शेअर करा. कमेंट करा.
https://bit.ly/37Aj3cz

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना पाहून मुलगी आणखीनच जोरदार रडू लागली. तिला समजावताना त्यांच्या लक्षात आलं की ती मुलगी एका बंद दाराकडे बोट दाखवत होती. दरवाजा आतून बंद होता आणि  आतून काहीच प्रतिसादही येत नव्हता अखेर नाइलाजाने त्यांना दरवाजा तोडावा लागला आणि आतलं दृश्य पाहून सर्वांना धक्काच बसला. एका महिलेने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती, आता त्यांच्या लक्षात आलं की ती चिमुरडी बंद दाराकडे बोट दाखवून का रडत होती पण त्याचवेळी या महिलेच्या बोटांची किंचितशी हालचाल झाल्याचे पोलीस नाईक किरण स्वार यांच्या लक्षात आलं आणि क्षणाचाही विलंब न लावता या महिलेचा गळफास सोडवण्यासाठी महिलेला वरून उचलले आणि पोलीस शिपाई पांडुरंग कवठे यांनी घरातल्या चाकूने पंख्याला बांधलेली ओढणी कापून काढली. अग्निशमन विभागाच्या राकेश सरोदे यांनी या महिलेला तातडीने जीवनरक्षक सीपीआर प्रणालीचा वापर करून तिचा श्वास सुरू केला. तातडीने या महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.

फीसाठी दबाव टाकल्यास शाळांवर कठोर कारवाई
https://bit.ly/2YtAZS3

पोलीस शिपाई आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी दाखवलेल्या या समयसूचकतेमुळे एका महिलेचे प्राण वाचले आणि एका चिमुरडीला आई परत मिळाली, नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी या कामाची दखल घेवून स्वार आणि कवठे यांना प्रोत्साहनपर बक्षिस जाहीर केल्याची माहिती एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी दिली.

====================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा