धनगर आरक्षणः आंदोलकांशी खासदार सुप्रिया सुळे यांची चर्चा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई,२६ फेब्रुवारी २०२०

धनगर आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आझाद मैदानावर बसलेल्या धनगर बांधवांची राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज भेट घेत चर्चा केली. धनगर समाजाच्या मागण्यांसाठी शिष्टमंडळाची कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते.

धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व आरक्षणासंदर्भात राज्यातील धनगर बांधव मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय बारणे व धनगर समाजाच्या नेत्यांनी सुळे यांना मागण्या ऐकून घेण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीचा मान ठेवून खासदार सुळे यांनी भेट घेतली आणि मागण्यांसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

================================================

इतर बातम्यांचाही मागोवा