ठाण्यात एक हजार 150 चौरस मीटरचे खड्डे भरले

अविरत वाटचाल न्यूज

ठाणे 17 जुलै 2018 :

ठाणे  महापालिकेचे सुमारे 300 इंजिनिअर्स, 1 हजार कामगार, 60 डंपर, 30 जेसीबीच्या साहाय्याने रेडीमिक्स काँक्रीट वापरून जवळपास 750 चौरस मीटरचे खड्डे भरण्यात आले तर पेव्हरब्लॉकच्या साहाय्याने 400 मीटरचे खड्डे भरण्यात आले. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील सर्व खड्डे भरण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिल्यानंतर खड्डे भरण्याची व्यापक मोहिम आज राबविण्यात आली.दरम्यान यापुढे दर मंगळवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे शहरातील विविध कामांची, नाले सफाई, साफसफाई याबाबत पाहणी करणार आहेत.

  • रस्त्यातील खड्डे तातडीने भरता यावेत यासाठी ॲक्वा पॅच या नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुंब्रा येथे, रेनकॉनच्या साहाय्याने कोपरी पूल येथील तर पॉलिमर सिरॅमिक काँक्रीटच्या साहाय्याने कॅसल मिल येथील खड्डे भरण्यात आले आहेत. विशेष म्हणजे थोडीशी काळजी घेतल्यास पावसातही या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खड्डे भरता येत असल्याने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे भरण्याची कार्यवाही करावी अशा सूचना नगर अभियंता अनिल पाटील यांना दिल्या.

 

  • आज दिवसभरात शहरातील 750 चौरस मीटरचे खड्डे रेडिमिक्स काँक्रीटच्या साहाय्याने भरण्यात आले. तर 400 चौरस मीटरचे खड्डे पेव्हर ब्लॉकच्या साहाय्याने भरण्यात आले. तर 500 चौरस मीटरचे खड्डे कच्च्या पद्धतीने भरण्यात आले जेणेकरून कुठलाही अपघात होवू नये.

खड्ड्यांबाबत नागरिकांशी संवाद

  • ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्याच्या पाहणी दौऱ्या दरम्यान महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्त्यांची सध्यस्थिती जाणून घेण्यासाठी शहरातील विविध परिसरातील रिक्षा चालक, स्थानिक नागरिक, सफाई कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी यांच्याशी थेट संवाद साधला. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्यांचा शहरवासियांना त्रास होऊ नये, याकरिता महापालिकेच्या संपूर्ण यंत्रणेसह आज महापालिका आयुक्तांनी शहरातील रस्त्यांचा पाहणी दौरा केला. या पाहणी दौरा दरम्यान कोणत्या रस्त्यावर किती खड्डे आहेत, खड्ड्याचे प्रमाण कोणत्या रस्त्यावर सर्वाधिक आहे याची शहानिशा करण्याकरीता आयुक्तांनी रिक्षा चालकांशी  सुसंवाद साधला. यावेळी रिक्षाचालकांनीही मोकळेपणाने संवाद साधत शहरातील खड्ड्याची योग्य ती माहिती आयुक्तांना दिली.

=============================================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • रस्त्यांवरील खड्डे आणि मनसेचे खळ खट्टय़ाक