जनता कर्फ्यू : नवी मुंबईत शुकशूकाट

महापालिका व पोलीस प्रशासन सतर्क

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २२ मार्च २०२०

कोरोना विषाणुचे संक्रमण थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वेच्छेने जनता कर्फ्युच्या केलेल्या आवाहनाला नवी मुंबईकरांनी मनापासून प्रतिसाद देत १०० टक्के बंद चालू ठेवला आहे. एरवी गजबजेला सायन-पनवेल महामार्ग असो वा मालवाहतुकीने गजबजलेला नवी मुंबईतून जेएनपीटीकडे जाणाऱ्या मार्गावर एकही वाहन धावत नसल्यामुळे शुकशूकाट पसरला आहे.

  • जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रकोप भारतातही वाढू लागला आहे. कोरोनामुळे अनेकांचे बळी गेल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी केंद्र सरकारने जनता कर्फ्युचे आवाहन केले आहे. सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत लागू असलेल्या या जनता कर्फ्युला नवी मुंबईकरांनी आपले कर्तव्य समजून सकाळपासूनच १०० टक्के प्रतिसाद दिला आहे.

‘होम क्वारंटाईन’ चे काटेकोर पालन न करणा-या व्यक्तींवर होणार कायदेशीर कारवाई
https://bit.ly/33z3L62

गर्दी टाळण्यासाठी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तपासणी होणार
https://bit.ly/2Uce39b

पहिली ते आठवींपर्यन्त परीक्षा रद्द
https://bit.ly/2U5Jnq1

  • रस्त्यावर नागरिक नसतानाही पोलीस मात्र ठिकठिकाणी गस्त घालून नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन करीत होते. नवी मुंबई, पनवेल परिसरात आज जनता कर्फ्यू पाळला जात आहे. शहराच्या अंतर्गत रस्त्यांसोबतच शहरातून जाणारा आणि अतिशय वर्दळीचा असणारा सायन पनवेल महामार्ग आणि  उरण जेएनपीटीला जोडणा-या आम्रमार्गावरही शुकशुकाट आहे. एखाद दुसरी बेस्टची बस, रुग्णवाहिका, पोलीस गाड्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. शहरातला मुख्य अंतर्गत रस्ता मानला जाणा-या पामबीच रस्त्यावरही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी झटणारे सफाई कामगार आजही शहराच्या विविध भागांत  कर्तव्य बजावताना दिसत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द
https://bit.ly/3dcjooe

 

नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी शहरात फिरून परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरिकांना दिवसभर घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.

========================================================

इतर बातम्यांचाही मागोवा