कमी संक्रमित जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी येत्या दोन दिवसात कार्ययोजना सादर करणार

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची डिक्कीच्या सदस्यांना ग्वाही

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, १५ एप्रिल २०२०

 राज्यातील कोरोनाची लागण, संक्रमण नाही किंवा  कमी आहे अशा जिल्ह्यात उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्याचा उद्योग विभाग कार्ययोजना तयार करीत असून येत्या दोन दिवसात ही कार्ययोजना सादर करण्यात येऊन लवकरच उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) च्या 15 व्या स्थापना दिनानिमित्त  राज्यातील डिक्कीच्या सदस्यांना संबोधित करतांना बोलत होते.

  • व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमाने राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचेशी डिक्कीच्या सर्व जिल्यातील सदस्य व पदाधिकारी अशी अनौपचारिक चर्चा पार पडली. यावेळी डिक्की चे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे, डिक्की वेस्ट इंडियाचे अध्यक्ष निश्चय शेळके, डिक्की वेस्ट इंडियाचे बँकिंग प्रमुख विजय सोमकुवर,  डिक्की महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष कांबळे, डिक्की मुंबईचे अध्यक्ष अरुण धनेश्वर, डिक्की विदर्भचे अध्यक्ष गोपाल वासनिक, मराठवाडा चे अध्यक्ष मनोज आदमने, मुंबईचे उपाध्यक्ष पंकज साळवे यांचेसह 100 डिक्की उद्योजक व त्यांचे सहकारी असे 500 जण सहभागी झाले होते.
  • शिवभोजन पुढील ३ महीने पाच रुपयांत मिळणार
    https://bit.ly/3aR9eYJ

 

  • यावेळी लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांना कोरोनाच्या संकटामुळे येणाऱ्या अडचणी डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, निश्चय शेळके, संतोष कांबळे व पंकज साळवे आंदींनी उद्योगमंत्र्यांसमोर मांडल्या. या सर्व विषयांवर सर्व संबंधितांची बैठक बोलाविण्यात येऊन तोडगा काढन्यात येईल तसेच या संकटावर मात करण्यासाठी राज्याचा उद्योग विभाग लवकरच कृती आराखडा निर्माण करीत व सर्व उद्योजकांच्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन उद्योगमंत्री यांनी दिले.

========================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा