आश्रमशाळेतील मुलांना मदत करून वाढदिवस साजरा

मनसेच्या माजी आमदाराच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • कल्याण, १० जून २०१
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आमदार प्रकाश भोईर व जिल्हाध्यक्षा नयना भोईर यांची कन्या नवमी भोईर हिचा वाढदिवस आश्रमशाळेतील मुलांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करून साजरा करण्यात आला. टिटवाळा येथील अंकुर सामाजिक संस्था संचालित अंकुर बालविकास केंद्र या आश्रमशाळेतील शेकडो मुलांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कोणताही मोठा गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
अंकुर सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अक्षदा भोसले यांनी भोईर परिवाराचे आभार मानले आहेत.
आश्रमशाळेतील मुलांनी आपल्या विविध कौशल्यगुणांचं दर्शन घडविले.मुलांच्या या कलाविस्कारांना उपस्थितांनी दाद दिली.
  • या प्रसंगी मनसे सरचिटणीस व माजी आमदार प्रकाश भोईर,जिल्हाध्यक्षा नयना भोईर,स्वाती कदम,उपशहर अध्यक्षा गीता काट्रप,उपविभाग अध्यक्षा कोमल राय,विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत, किरण गायकवाड़ तसेच प्रसिद्ध मूर्तिकार प्रशांत गोडांबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
  • ===================================================
  • इतर बातम्यांचाही मागोवा