उलवे परिसरात सुसज्ज रक्तपेढी उभारण्याची समाजसेवक किरण मढवी यांची मागणी

जागतिक रक्तदान दिनानिमित्त केले रक्तदान

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • उरण, १४ जून २०२०

जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून उलवे येथील समाजसेवक आणि पर्यावरण प्रेमी किरण एकनाथ मढवी यांनी आज सकाळी पनवेल येथील श्री. साई ब्लड बँकेत जाऊन रक्तदान केले. यावेळी डॉ.अबू बक्र, रायगड भूषण मनोज पाटील सर, आणि सामाजिक कार्यकर्ते सुनिल पाटील यांच्या हस्ते समाजसेवक किरण मढवी यांना रक्तदात्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

  • किरण मढवी यांनी उलवे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. त्यामुळे वैद्यकीय सोयी सुविधाही निर्माण होण्याची गरज व्यक्त करून किरण मढवी यांनी उलवे नोड परिसरात एक सुसज्ज अशी उरण मतदारसंघातील पहिली रक्तपेढी व्हावी म्हणून स्थानिक आमदार महेश बालदी  यांची भेट घेवून निवेदन दिले.

 

 

  • उरण तालुक्यात खासकरून उलवे परिसरात वृक्षारोपणासाठी किरण मढवी करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतूक करून लवकरच उलवे परिसरात सुसज्ज ब्लड बॅंक सुरु करण्याबाबत ठोस पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार बालदी यांनी यावेळी दिले.

====================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा