35 मीटरचा रस्ता 60 मीटर रूंद होणार

  • ठाण्यात रस्ता रूंदीकरणातंर्गत वाय जंक्शन ते कल्याण फाटा येथे महापालिकेची धडक कारवाई

अविरत वाटचाल न्यूज

ठाणे, 26 सप्टेंबर 2018:

ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील वाय जंक्शन ते कल्याण फाटा या रस्त्याच्या रुंदीकरणाची धडक कारवाई आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. ठाणे महानगरपालिका व मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरण यांच्यावतीने ही कार्यवाही करण्यात आली. या कारवाईमुळे 35 मीटरचा रस्ता 60 मीटर इतका रुंद होणार आहे. 

मोठ्या इमारतींसह अनेक बांधकामे पाडली

  • सदर कारवाईमध्ये कौसा बायपास टोलनाका ते भारत गिअर कंपनी, दुवा अपार्टमेंट शिबलीनगर, वाय जंक्शन या रोडवरील ६ मोठ्या इमारती, 30 छोटी बांधकामे, भारत गिअर कंपनीचा काही भाग तसेच काही खाजगी जागेत ही कारवाई करण्यात आली.

35 मीटरवरून 60 मीटर रुंद रस्ता होणार

  •  सद्यस्थितीत ३५ मीटरचा रस्ता उपलब्ध असून या रस्ता रुंदीकरणामध्ये 60 मीटरचा रस्ता करण्यात येणार आहे. या रस्ता रुंदीकरणामुळे शीळ फाट्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. या रुंदीकरणामध्ये जमीन हस्तांतराची प्रक्रिया सुरु असून सुमारे १९० कुटुंबांचे पुनर्वसन महापालिकेने केले आहे.

========================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • वाहतुकीला अडथळा ठरणारे सीबीडी सर्कल हटवणार