रविवारी मडगाव-सीएसटी विशेष ट्रेन चालवणार

नवी मुंबई, 20 जानेवारी 2017/AV News Bureau:

प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून मध्य रेल्वेच्या सहाय्याने कोकण रेल्वे मार्गावर २२ जानेवारी रोजी मडगाव- सीएसटी (00112) ही विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. या विशेष गाडीसाठी नियमित भाड्यामध्ये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गाडी क्रमांक 00112 मडगाव- मुंबई सीएसटी ही विशेष गाडी रविवारी, 22 जानेवारी रोजी सकाळी 10.40 ला मडगाव स्थानकातून सोडण्यात येईल. ही गाडी त्याचदिवशी रात्री 10.45 ला सीएसटी रेल्वे स्थानकात पोहोचेल.

या विशेष गाडीला थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापुर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळुण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे आणि दादर या रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात येणार आहे.

या विशेष गाडीला 18 डबे असणार आहेत. यामध्ये एसी 3 टायरचा 1 डबा, स्लीपरचा 1 डबा, जनरलचे 14 डबे आणि 2 एसएलआर डब्यांचा समावेश आहे.

20 जानेवारीपासूनच या विशेष गाडीचे आरक्षण सुरु करण्यात आले आहे. या विशेष गाडीच्या तिकिटाच्या नियमित भाड्यामध्ये आसन व्यवस्थेसाठी कमीत कमी 10 टक्के आणि एसी तसेच स्लीपर तिकिटासाठी जास्तीत जास्त 30 टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल, असे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी दिली.