भाजप वर्धापन दिनानिमित्त अतुल शाह यांच्यावतीने सीपी टॅंक सर्कल येथे पक्षाचे ध्वजारोहण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, ६ एप्रिल २०२१

भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनानिमित्त   भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक अतुल शाह यांच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर आणि सुरक्षेचे नियम पाळून विविध ठिकाणी पक्षाचे ध्वजारोहण करण्यात आले.

सर्वप्रथम गोल  देऊळ येथे सायंकाळी ५ वाजता  आणि सी पी टॅंक सर्कल येथे सायंकाळी ५.३० वाजता अतुल शाह यांनी पक्षाचे ध्वजारोहण करण्यात केले. त्याचप्रमाणे शाह ह्यांच्या १०० स्नेह सदन, सी पी टॅंक येथील कार्यालयातही  संध्याकाळी ६ वाजता  पंडित दीनदयाळ उपाध्याय ह्यांच्या फोटोला पुष्पहार घालून पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

सध्या कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. त्यामुळे अतुल शाह यांच्यावतीने नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले.

यावेळी मंडळ महामंत्री नुतनबेन सोनी , मुंबादेवी महिला मोर्चा अध्यक्षा वरलक्ष्मी अलिशेट्टी,  धनराज संघवी,  प्रेम शर्मा, चंदन भन्साळी, शिवशंकर शुक्ला, हिरालाल मेहता, गणपत पुरोहित, संजय साखरकर, 220 वॉर्ड अध्यक्ष तबरेज मेनन, 223 वॉर्ड अध्यक्ष अनिल तिवारी, बळवंत गायकवाड, विजय गायकवाड,  मनिष चौरसिया, मुकेश मिश्रा, दीपिका दर्जी, शीला इंजमुरी, संदीप मांजरेकर, संदीप चव्हाण, भावेश मुथा,डी डी शुक्ला, मुकेश गावकर, राजेश चौरसिया , अशोकभाई चौरसिया, पप्पूभाई चौरसिया, रमेश वाघेला,द्वारका चौरसिया,  मोहन चौरसिया आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

========================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप