संदीप माळवी ठाणे महापालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त  

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 30 जून 2021:

ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी संदीप माळवी यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने आज त्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत. महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले.

अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी यांचे शिक्षण कोल्हापूर या त्यांच्या मूळ गावी झाले असून त्यांनी एमबीए, एलएलबी, बीजेसी, नागरी व्यवस्थापनामध्ये पदविका आणि बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले आहे.

माळवी यांनी 12 वर्षे पत्रकारिता मध्ये काम केले आहे. माळवी यांनी २००२ साली शासकीय सेवेला सुरूवात केली. राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्थेत सह संचालक माहिती शिक्षण व संपर्क म्हणून काम केले आहे. सन 2005 साली ते ठाणे महापालिका मध्ये मुख्य माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून रूजू झाले. गेली 6 वर्षे ते उप आयुक्त पदावर कार्यरत आहेत. उत्तम प्रशासकीय अधिकारी यासोबत ते उत्तम कवी, गझलकार, गीतकार, लेखक म्हणून परिचित आहेत.
——————————————————————————————————