30 जुलै पर्यंत परशुराम घाट संध्याकाळी बंद राहणार

 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 19 जुलै 2022:

मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूण आणि खेड तालुक्याला जोडणा-या परशुराम घाटात 30 जुलै पर्यंत सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. तसेच सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
मुंबई गोवा- महामार्गाच्या चौपदीकरणाच्या कामासाठी परशुराम घाटात एप्रिल- मे महिन्यात काम सुरू करण्यात आले होते. हे काम पावसाळ्याआधी पूर्ण होवू शकले नाही. पाऊस सुरू झाल्यापासून 3 जुलै रोजी घाटात दरड कोसळली होती त्यानंतर या घाटातील वाहतूक धोकादायक बनली आहे. आता हा घाट 30 जुलै पर्यंत सकाळी 6 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अवजड वाहनांच्या एकेरी वाहतूकीसाठी सुरु ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वा. ते 6 वा. पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

तसेच राजापूर-कोल्हापूर यांना जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटातील वाहतूक दरड कोसळल्याने एकेरी सुरु ठेवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफ (NDRF)च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

  • —————————————————————————————————मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप