ठाणे जिल्ह्यातील आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचा निर्णय

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, १९ मार्च २०२०

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण क्षेत्रातील आठवडी बाजार दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

  • कल्याण तालुक्यातील पिंपरी,गोवेली,म्हारळ, बेहेरे, राया- ओझर्ली,  भिवंडी  तालुक्यातील चिंबीपाडा, कोन, खारबाव, पडघा, पाच्छापुर, अनगाव, दाभाड, वज्रेश्वरी, अंबाडी, अस्नोली , मुरबाड तालुक्यातील.सरळगाव,धसई,टोकावडे,म्हसा.  शहापूर तालुक्यातील आटगाव, किन्हवली, सापगाव, गोठेघर, पिवळी, मोखावणे- कसारा, शेणवे, अघई, डोळखांब या ठिकाणचे आठवडी बाजार बंद राहतील.

या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांविरोधात भारतीय दंडसंहिता   1860 (45) याच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

==============================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा