अंधेरी पोटनिवडूक : 7 उमेदवारांचे  अर्ज  मागे ; निवडणूक होणार


  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 17 ऑक्टोबर 2022

महाराष्ट्र विधानसभेच्या  अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक  होत असून  रिंगणात उतरलेल्या 14 पैकी 7उमेदवारांनी अर्ज  मागे घेतले आहेत. त्यामुळे 7उमेदवार रिंगणात उरले असल्याने ही निवडणूक होणार आहे.  उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार ॠतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात मुख्य लढत होणार होती. मात्र शेवटच्या टप्प्यात भाजपने  उमेदवार मागे घेत लटके यांचा मार्ग मोकळा केला. दरम्यान, अदयाप सात उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक होणार आहे . ही निवडणूक  होणार असली तरी  ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवडणूक न लढण्याचे भाजपला आवाहन केले होते. त्यानंतर भाजपने उमेदवारी मागे घेत  ऋतुजा लटके  यांचा मार्ग मोकळा केला.  राज ठाकरेंच्या  या कृतीचा  भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या समर्थकांनी निषेध केला आहे.