नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी मिलिंद भारंबे

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
    नवी मुंबई, १४ डिसेंबर २०२२

नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांची बदली झाली आहे. त्यांच्याजागी विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा सुव्यवस्था महाराष्ट्र ) मिलिंद भारंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज संध्याकाळी बेलापूर इथल्या कार्यालयात त्यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नवी मुंबई पोलीस हद्दीत कायदा व सुव्यस्था राखणे, भयमुक्त वातावरण निर्माण करणे आणि नागरिकांशी संवाद वाढवत प्रत्येक पोलीस ठाण्यात सामान्य नागरिकांना आपलंस वाटेल यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचे भांबरे यांनी  असल्याची प्रतिक्रिया यावेळी पोलीस आयुक्त मिलिंद  भारंबे  यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे महिला, ज्येष्ठ नागरीक आणि मुलांना सुरक्षित वाटेल, यादृष्टीने आपण अधिक लक्ष घालणार असून संघटीत गुन्हेगारी, अंमली पदार्थांचे गुन्हे असो वा सायबर गुन्हेगारी मोडीत काढण्यावरही आपला अधिक भर असणार आहे. याशिवाय पासपोर्टसाठी लागणारी पडताळणी असो वा सामान्य नागरिकांना आवश्यक ते सहकार्य वेळेत आणि अधिकाधिक सुलभपद्धतीने  मिळेल, या बाबींकडेही आपण लक्ष देणार  असल्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त मिलिंद भांरबे यांनी यावेळी सांगितले.

==================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप