मुंबई १९९३ बॉम्बस्फोटप्रकरणी सालेमसह 6जण दोषी

मुंबई, 16 जून 2017/AV News Bureau:

मुंबई शहरात 1993 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणात विशेष टाडा न्यायालयाने गॅंगस्टर अबू सालेमसह सहा जणांना दोषी ठरवले आहे. एका आरोपीचा न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. याप्रकरणी आता सोमवारपासून युक्तीवाद सुरू होणार आहे.

न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत अबु सालेमसह मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दिकी आणि करीमुल्लासह शेख यांना बॉम्बस्फोटप्रकरणात दोषी ठरवले आहे. तर अब्दुल कयुमला निर्दोष सोडण्यात आले.

12 मार्च 1993 मध्ये अवघ्या दोन तासांत हल्लेखोरांनी मुंबईत एअर इंडिया इमारत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजसह 12 ठिकाणी घडवून आणलेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 257 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर 713 जण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटांमध्ये सुमारे 27 कोटी  रुपयांच्या मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणात आरोपी असलेल्या अबु सालेम याला पोर्तुगाल सरकारने  फाशी न देण्याच्या अटीवर त्याचे भारताच्या सुपर्द केले होते. त्यामुळे या प्रकरणात फाशीची शिक्षा होवू शकत असली तरी देता येणे शक्य नसल्याचे बोलले जाते.

मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित काही मुद्दे

  • 12 मार्च 1993 साली 12 साखली बॉम्बस्फोट
  • 257 नागरिकांचा मृत्यू, 713 जण गंभीर जखमी
  • अबु सालेम, मुस्तफा डोसासह 7 जण आरोपी
  • याप्रकरणात सालेमला पोर्तुगालवरून भारतात आणले गेले
  • स्फोटके आणणे, कट रचणे आणि बॉम्बस्फोट घडवण्यास मदत करण्याचे सालेमवर आरोप
  • याप्रकरणी 100 जणांना दोषी ठरवले गेले
  • 12 आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली
  • याकुब मेमनला फाशी दिली गेली
  • 2012 पासून मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला सुरू झाला
  • न्यायालयाने 750 साक्षीदारांची साक्ष नोंदवली.तसेच 50 बचावपक्षाच्या साक्षीदारांचीही साक्ष नोंदवली.
  • दाऊद इब्राहिम, टायगर मेननसह  27 हून अधिक आरोपी अद्याप फरार