नवी मुंबईत वर्षभरात ही कामे होणार

  • महापालिका आयुक्त एन. रामास्वामी यांच्याकडून कामांची यादी जाहीर

नवी मुंबई, 20 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल :

महापालिका आयुक्त एन. रामास्वामी यांनी सन 2018-19 या वर्षाचे अंदाजपत्रक आज स्थायी समितीच्या बैठकीत मांडले. सुमारे 3 हजार 151 कोटी रुपयांच्या या अंदाजपत्रकात अनेक विकास कामे करण्याबाबत  मुद्दे मांडण्यात आलेले आहेत. त्यानुसार येत्या वर्षभरात नवी मुंबई महापालिका हद्दीत करावयाच्या विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद जाहीर केली आहे.

  • नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गांव गावठाण तसेच झोपडपट्टी क्षेत्रातील रस्ते, फुटपाथ व गटारे इ. नागरी सुविधासाठी 15.71 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
  • नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गांव गावठाण तसेच झोपडपट्टी क्षेत्रामध्ये उर्वरित ठिकाणी मलनि:स्सारण वाहिन्या टाकण्याकरिता 20 कोटी इतकी  तरतूद करण्यात आली आहे.

SMART CITY च्या अनुषंगाने पामबीच रोड लगत सायकल ट्रॅक उभारणेकरिता तसेच नमुंमपा हद्दीत नागरिकांकरिता अडथळामुक्त्‍ रस्ते व पदपथाची सुविधा उपलब्ध् करुन देणेकरिता “अडथळामुक्त रस्ते/फुटपाथ गटारे बांधणे” या कामासाठी 130.99 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

  • नमुंमपाच्या सर्व इमारतीमध्ये बॅरीयर फ्री अदययावत सुविधा उपलब्ध्‍ करणेकरीता तसेच सर्व कार्यालयामध्ये “हिरकणी कक्ष” उभारणे या दोन्ही कामांकरीता अंदाजपत्रकामध्ये “प्रशासकीय/निवासी इमारती बांधणे” साठी 29.14 कोटी तरतूद करण्यात आली आहे.

सर्व उडडाणपुलांखालील जागांचे सुशोभिकरण करणे व तेथे बॅडमिंटन कोर्ट/ इतर सुशोभिकरण करणेकरिता “नवीन उडडाणपुल बांधणे” साठी 10 कोटी तरतूद करण्यात आली आहे

महापालिका हद्दीतील सर्व “पे अँड पार्क” भूखंड विकसित करणे तसेच आवश्यक तेथे बहुमजली “पे अँड पार्क” तयार करण्यासाठी 35 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

  • शहर सुशोभिकरणांतर्गत विविध कामे करणे तसेच शहरातील महत्वाच्या चौकामध्ये / मोक्याच्या 10 ते 12 ठिकाणी जनहितार्थ जाहिरातीचे एल.ई.डी. फलक उभारणे व तुर्भे से. 20 येथील पामबीच रोड लगतचे मलनि:स्सारण केंद्राजवळील भूखंडांचे सुशोभिकरण करणेकरिता “शहर सुशोभिकरण”  लेखाशिर्षाअंतर्गत रु.19.80 कोटी तरतूद करण्यात आली आहे.
  • शहरात आधुनिक पध्दतीचे सायन्स सेंटर उभारणे तसेच इतर उद्याने विकसित करणे याकरिता “बालोदयान/सायंटिफिक म्युझियम विकसित करणे” या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 30.00 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.
  • नमुंमपा हद्दीतील सर्व मार्केटची सुधारणा व सुशोभिकरण करण्याचे नियोजन असून त्याकरिता “मंडई/ओटले बांधणे” या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 20.50 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
  • वाचनसंस्कृतीच्या वाढीसाठी सध्याचे ऑनलाईल वाचनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नमुंमपा क्षेत्रातील सर्व वाचनालयांत ई-लायब्ररी संकल्पना राबविण्याचा मानस असून त्याकरिता “ई-लायब्ररी” या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 70 लक्ष तरतूद करण्यात आलेली आहे.
  • विविध समाजांची मोठ्या प्रमाणावरील मागणी लक्षात घेऊन करावे गाव येथील विदयुत दाहिनी दुरुस्त करणे तसेच तुर्भे येथे नवीन विदयुतदाहिनी बसविणे या कामांसह इतर कामांकरिता “विदयुत/गॅस दाहिनी उभारणे” या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 4.05 कोटी तरतूद करण्यात आली आहे.
  • सर्व शाळांची मैदाने विकसित करुन त्यामध्ये खो-खो, कबड्डी, लांब उडी (Long Jump), उंच उडी (High Jump) इ. खेळांकरिता आवश्यक ती व्यवस्था करणे व तदनुषंगिक कामे करण्याकरिता “शालेय मैदाने देखभाल दुरुस्ती” लेखाशिर्षामध्ये रु. 15.01 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

अदिवासी बांधवाकरीता घरे बांधणेकरिता रु. 9.30 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

सर्व नागरी आरोग्य केंद्रांच्या इमारतींची दुरुस्ती व सुधारणा करणेकरिता “रुग्णालये देखभाल दुरुस्ती” लेखाशिर्षामध्ये रु. 10.18 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांत अद्ययावत यंत्रणा तसेच संगणकीय प्रणालीयुक्त असे केंद्रिय औषध भांडार उभारण्याचे नियोजन आहे. त्याकरिता नियोजनबद्ध इमारत बांधणे तसेच आवश्यक रुग्णालयीन बांधकाम करणेकरिता “दवाखाने बांधणे” या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 40.00 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

  • “उद्यानांचे शहर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रात विशिष्ट संकल्पनांवर आधारित उद्याने विकसित करण्याचे नियोजन असून सानपाडा येथे विशेष Sensory Garden आणि ई.टी.सी. केंद्रासमोरील जागेची उदयानविषयक सुधारणा करण्याचे नियोजन आहे.
  • नमुंमपा कार्यक्षेत्रातील रस्त्यांवरील सोडियम व्हेपर दिवाबत्ती बदलून एल.ई.डी. दिवाबत्ती लावणे प्रस्तावित आहे. यामुळे एकूण वीजदेयकाची अंदाजे 40% ते 50% बचत होणार आहे. तसेच सदर एल.ई.डी. दिवाबत्तीचे आयुर्मान जादा असल्याने त्यावरील देखभाल दुरुस्तीच्या खर्चात सुध्दा बचत होणार आहे. याकरिता एकूण रु. 30.38 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे डोमला मार्बल लावणे व स्मारकाची अंतर्गत सजावट करणेकरिता एकूण रु. 26.04 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

  • विष्णुदास भावे नाटयगृहाच्या धर्तीवर ऐरोली येथे नाटयसंकुल बांधणे तसेच घणसोली येथे लोककला केंद्र बांधणे याकरिता एकूण  15 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
  • विष्णुदास भावे नाटयगृहाचे सुशोभिकरण करण्यासाठी 10.25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.