कोकणातील आरोग्य केंद्रांत उष्माघातावरील उपचारासाठी स्वतंत्र कक्ष

कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर यांचे नागरिकांना आवाहन 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
    नवी मुंबई, 17 एप्रिल 2023

कोंकण विभागातील तापमानात वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. त्रास होऊ लागल्यास जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालय अथवा तालुका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. अनेक आरोग्य केंद्रात उष्णतेचा त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची सोय करण्यात आली असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

उष्णतेच्या ताटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी अनावश्यक घराबाहेर पडू नये. आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहनही कोंकण आयुक्तांनी केलं आहे.

चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे स्नायूंना आकडी येणे अशी लक्षणे दिसू लागताच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करावा.

दरम्यान, 16 एप्रिल रोजी खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला उपस्थित राहीलेल्या सुमारे 13 श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

भारतीय हवामान खात्यानेदेखील यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक कडक असल्याचा इशारा दिलेला आहे. यापार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र