सिंधुदूर्गातील पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर

 मुंबई, 4 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी लगत असलेल्या गावांमधील पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी करून स्वतंत्र आराखडा तयार करण्यासंदर्भातील सूचना देण्यात येतील, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळाशिल, आचरा व पोळम या गावातील नागरिकांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य वैभव नाईक यांनी विचारला होता.

किनारपट्टीलगतच्या गावांमध्ये क्षारयुक्त पाणी असेल तर आरओ सिस्टीम लावण्याचा विचार शासन करील.क्षारयुक्त पाण्यासंदर्भातील समस्या सोडविण्या संदर्भातील कारवाई करण्याचे आदेश संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात येतील,असेही लोणीकर यांनी स्पष्ट केले.