परवान्यासाठी लाच मागणाऱ्या लघुपाटबंधारे विभागाच्या मोजणीदारास रंगेहाथ पकडले

कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई

  • अविरत वाटचाल न्यूज नेवर्क
  • कोल्हापूर, 17 एप्रिल 2023

कोल्हापूर जिल्ह्यातील ताम्रपर्णी नदीतून पाणी उपसा करण्यासाठी लागणारा परवाना देण्यासाठी साडे  आठ हजारांची लाच मागून 5 हजार रुपयांचा लाचेचा दुसरा हप्ता स्वीकरताना चंदगड तालुक्यातील चंदगड लघुपाटबंधारे शाखा क्रमांक १ मधील मोजणीदार कर्मचारी सागर गुणवंत गोळे (३६) या कर्मचाऱ्याला कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १७ एप्रिल रोजी रंगेहाथ पकडले आहे. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या धडक कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणातील तक्रारदार यांनी तालुक्यातील ताम्रपर्णी नदीतून शेतीसाठी रीतसर पाणी उपसा करण्याबाबतचा परवाना मिळण्यासाठी चंदगड लघुपाटबंधारे विभागाकडे अर्ज केला होता. सदर परवाना देण्यासाठी चंदगड तालुक्यातील चंदगड लघुपाटबंधारे शाखा क्रमांक १ मधील मोजणीदार कर्मचारी सागर गुणवंत गोळे (३६) तक्रारदाराकडे ८,५०० रुपयांची लाच मागितली होती. मात्र रितसर परवानगी मागितलेली असतानाही चंदगड तालुक्यातील चंदगड लघुपाटबंधारे शाखा क्रमांक १ मधील मोजणीदार कर्मचारी सागर गुणवंत गोळे (३६) याने लाच मागितली. नाईलाज म्हणून तक्रारदाराने पहिल्या टप्पा म्हणून ३ हजार रुपये सागर गुणवंत गोळे याला दिले. त्यानंतर तक्रारदार यांनी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सागर गुणवंत गोळे या कर्मचाऱ्याची लाच मागत असल्याबाबतची तक्रार केली. तसेच तडजोडीअंती आणखी पाच हजार रुपये देण्याचे मान्य केले.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यात सत्यता आढळून आली. त्यानंतर कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच पोलीस अधिक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक नेमण्यात आले. या पथकाने 17 एप्रिल रोजी चंदगड लघुपाटबंधारे शाखा क्रमांक १ च्या कार्यालयात सापळा रचून पंचांसमक्ष सागर गुणवंत गोळे (36) याला तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सागर गुणवंत गोळे (36) या मोजणीदार कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई  कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, सहाय्यक फौजदार भंडारे, पोलीस नाईक सुधीर पाटील, सचिन पाटील,पोलीस कर्मचारी मयुर देसाई, विष्णु गुरव यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र