कौशल्यवर्धित उद्योगाभिमुख 41 प्रकारच्या प्रशिक्षणांचा लाभ घेण्याचे आवाहन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 14 मे 2023

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध समाज घटकांसाठी नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा यादृष्टीने या योजनांची माहिती विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.अशाच प्रकारची एक अभिनव योजना युवक – युवती यांच्याकरिता राबविण्यात येत असून याद्वारे 41 प्रकारचे कौशल्यवर्धित प्रशिक्षण युवकांना दिले जात आहे. या प्रशिक्षणाद्वारे एखाद्या विशिष्ट विषयात कौशल्यवृद्धी व्हावी व यामधून रोजगार व स्वयंरोजगाराकरिता तरुणाईला त्याचा उपयोग व्हावा ही भूमिका नजरेसमोर ठेवण्यात आलेली आहे.

तथापि या योजनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती व विमुक्त भटक्या जमाती अशा मागासवर्गीय घटकांतील युवक – युवतींचा तितकासा प्रतिसाद आढळून येत नाही. ही सर्व कौशल्यवर्धित प्रशिक्षणे त्यांच्या विकासाकरिता व त्यांच्याकडील ज्ञान वाढवण्याकरता अत्यंत महत्त्वाची असून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे
या 41 प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये – शिवणकाम, फॅशन डिझाइनिंग, मेहंदी व ब्युटीशियन, ॲडव्हान्स ब्युटिशियन, एमएससीआयटी, डीटीपी ग्राफिक्स अँड आर्ट्स ( पेजमेकर, कोरल ड्रॉ, फोटोशाॅप), काॅम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग, मल्टीमीडिया अँड ॲनिमेशन टेक्नॉलॉजी, फ्लोरीस्ट (पुष्पसजावट), वेब डिझाईनिंग, काॅम्प्युटर बेसिक प्रोग्रामिंग( सी अॅन्ड सी++), ई-टॅक्सेशन/ टॅली/ ईआरपी, वाहन चालविणे (तीन चाकी व चार चाकी), जड वाहन चालविणे, ओल्या व सुक्या कचऱ्यापासून खत तयार करणे (गृहनिर्माण सोसायटींमध्ये), कॅटरिंग व बेकरी प्रॉडक्ट्स, फ्रिज /एसी/ वॉशिंग मशीन दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती /लॅपटॉप व संगणक दुरुस्ती, बॅग बनवणे / पर्स / कागदी डिशेस/ मिठाई बॉक्स बनविणे, दोन चाकी / चार चाकी वाहने मेकॅनिक कोर्स, इलेक्ट्रिशियन, मोत्यांचे दागिने बनविणे (ज्वेलरी मेकिंग), फ्लोरीस्ट/ फुलांच्या परड्या बनविणे (पुष्प सजावट), वारली पेंटिंग, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, वॉशिंग पावडर व सोप बनविणे/ फ्लोअर क्लीनर तयार करणे, विविध मसाले बनविणे/ पापड – लोणची बनविणे, फळ प्रक्रिया ( सॉस, जॅम, लोणची इत्यादी), रिटेल मार्केटिंग (किरकोळ विपणन), टायपिंग, बेडसाईड असिस्टंट, रंगकाम, कॅलिग्राफी, हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट, स्टेनोग्राफी, क्रेश /बेबी सीटिंग केअर टेकर ट्रेनिंग, फॉरेन लँग्वेजेस, रिटेल सेल्स असोसिएट्स, ग्राहक सेवा कार्यकारी (कॉल सेंटर), विविध प्रकारच्या मेणबत्ती/ अगरबत्ती/ धूप /सुगंधी उटणे/ फेस पॅक/ सुगंधी तेल /हर्बल मेहंदी तयार करणे, कुशन कव्हर/डोअर मॅट/ रजई तयार करणे अशा 41 प्रकारच्या व्यवसाय प्रशिक्षणांचा समावेश आहे.
या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याच्या कुटुंबाचे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात किमान तीन वर्षे वास्तव्य असल्याबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अर्जदाराच्या वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा पॅन कार्डची छायाप्रत जोडणे आवश्यक असेल तसेच अर्जदाराने मागासवर्गीय असल्याबाबतचा जातीचा दाखला जोडणे अनिवार्य राहील.

या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी व याबाबतच्या अधिक माहिती करिता बेलापूर – नेरूळ विभाग : प्रकाश कांबळे (9969008088), वाशी – तुर्भे विभाग : सुंदर परदेशी (9594841666), कोपरखैरणे – घणसोली विभाग : दादासाहेब भोसले (9372106976), ऐरोली – दिघा विभाग : दशरथ गंभीरे (9702309054) या नमुंमपा समाजसेवकांशी संपर्क साधावा व सदर 41 विविध प्रकारच्या प्रशिक्षण योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन समाजविकास विभागाच्या वतीने करण्यात येत आहे

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र