ठाणे जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्टया जाहीर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 14 डिसेंबर 2023

ठाणे जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये येणाऱ्या शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टयांव्यतिरिक्त अतिरिक्त तीन स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार दि.27 ऑगस्ट 2024 गोपाळकाला, दि.17 सप्टेंबर 2024 अनंत चतुर्दशी, 31 ऑक्टोबर, 2024 नरक चतुर्दशी हे दिवस स्थानिक सुट्टयांचे दिवस म्हणून जाहीर करण्यात आले आहेत, असे कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

========================================================