लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी १८ जानेवारीपासून काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठका

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 16 जानेवारी 2024

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व विभागात विभागनिहाय बैठकांचे आयोजन केले आहे. १८ जानेवारी रोजी अमरावती येथून या बैठकांना सुरुवात होत आहे.

नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका होत असून विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरातमाजी मुख्यमंत्रीकाँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशोकराव चव्हाणविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारमाजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेपृथ्वीराज चव्हाणविधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटीलप्रदेश कार्याध्यक्षकाँग्रेस कार्यसमितीचे सदस्य चंद्रकांत हंडोरेआ. यशोमती ठाकूरआ. प्रणिती शिंदेप्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खानबसवराज पाटीलआ. कुणाल पाटीलराज्यातील माजी मंत्रीजिल्हा अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दोन सत्रात या बैठका होणार आहेत. विभागीय बैठक सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्यान व दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत होणार आहेत.

अमरावती विभागाची बैठक अमरावती येथे दिनांक १८ जानेवारी रोजीनागपूर विभागाची बैठक गडचिरोली येथे दिनांक २० जानेवारी रोजीपश्चिम महाराष्ट्राची बैठक पुणे येथे दिनांक २३ जानेवारी रोजीकोकण विभागाची बैठक भिवंडी येथे २४ जानेवारी रोजीउत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक धुळे येथे २७ जानेवारी रोजी तर मराठवाडा विभागाची बैठक लातूर येथे दिनांक २९ जानेवारी रोजी होणार आहे.

========================================================

 

========================================================