श्याम कदम यांची आपच्या सह-राज्य सचिव पदावर नियुक्ती

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 5 मे 2024

आम आदमी पार्टीचे नवी मुंबईचे माजी कार्यकारी अध्यक्ष श्याम कदम यांची आप महाराष्ट्र राज्य कार्यकारणी तर्फे महाराष्ट्र प्रदेश सह-सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारी अध्यक्ष असताना नवी मुंबईत केलेल्या कार्याची दखल म्हणून शाम कदम यांची राज्यस्तरीय समितीवर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली.

लेख : आईचा अधिकार

नवी मुंबईत आम आदमी पार्टी ची टीम वाढविण्यात आणि एकंदरीत केलेल्या सतत उत्कृष्ट सक्रिय कामाची पोचपावती देत आप महाराष्ट्र राज्य कार्यकारणी तर्फे, त्याची महाराष्ट्र प्रदेश सह-सचिव पदावर नियुक्ती केली आहे. आणी महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी गोपालभाई इटालिया आणी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील ह्यांच्या कडून त्यांना तसे नियुक्त पत्र देखील देण्यात आले आहे. ह्या नियुक्ती साठी राज्य सचिव डॉ अभिजित मोरे ह्यांचे सुध्दा मोलाचे मार्गदर्शन झाले.
पक्षश्रेष्टींनीं दिलेल्या ह्या नवीन जबाबदारी बद्दल मनपूर्वक आभार, माझ्या ह्या नवीन नियुक्तीचे पूर्ण श्रेय, मी माझ्या टीम आप नवी मुंबई सहकाऱ्यांच्या परिश्रमास देतो. पक्षातर्फे देण्यात येणारी प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडणार असल्याचे श्याम कदम यांनी स्पष्ट केले.

  • नवीन जबाबदारी बद्दल श्यामभाऊंचे अभिनंदन, ह्या नवनियुक्तीमुळे माझ्या टीम आप नवी मुंबईच्या विस्तार कार्यक्रमाला मदतच होणार आहे – दिनेशभाऊ ठाकूर – अध्यक्ष – आप नवी मुंबई

LEAD : आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हयांवर लक्ष

श्यामभाऊंच्या ह्या नियुक्तीमुळे टीम आप नवी मुंबईमध्ध्ये उत्साहाचे वातावरण असून, टीम कडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत, त्याच प्रमाणे आप नवी मुंबई उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर, देवराम सूर्यवंशी, डॉ शरद देशमुख, सुलोचना शिवानंदन, सुधीर पांडे ह्यांच्या कडून सुध्दा मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

========================================================


========================================================