उद्योगासाठी एका दिवसात पॅन आणि टॅन मिळणार

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2017:

नव्या कंपन्यांना उद्योग करण्यात सुलभता प्रदान करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या सहयोगाने एका दिवसात पॅन आणि टॅन (pan & tan card) देण्यास सुरुवात केली आहे.

31 मार्च 2017 पर्यंत तब्बल 19 हजार 704 नव्या कंपन्यांना पॅन जारी करण्यात आले. मार्च 2017 मध्ये 10 हजार 894 नव्या कंपन्यांना 4 तासांच्या अवधित पॅन प्रदान करण्यात आले. तर 94.7 टक्के कंपन्यांना अवघ्या 4 तासात टॅन प्रदान करण्यात आले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने इलेक्ट्रॉनिक पॅन कार्डही

द्यायला सुरुवात केली आहे. ई-मेलद्वारे ही पॅनकार्ड प्रदान केली जात असल्याचे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे.