नवी मुंबईतील शाळा,महाविद्यालयांचे थर्डपार्टी ऑडिट करा

नवी मुंबई पोलिसांचे शैक्षणिक संस्थांना आढावा बैठकीत सूचना

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २९ एप्रिल २०२५

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत ठोस कार्यवाही व्हावी यासाठी शाळा,महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी थर्डपार्टी ऑडिट करून घ्यावे यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ अंतंर्गत पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी संबंधितांची आढावा बैठक घेवून सूचना केल्या.

हे  वाचा : आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हयांवर लक्ष -पोलीस आयुक्त

पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, वाशी, नवी मुंबई मधील १० पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत असणा-या शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक संस्था यांचेकडून महाराष्ट्र शासनाव्दारे विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता करावायचे उपाययोजनांबाबतच्या परिपत्रकाची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यात येते किंवा कसे याचा आढावा घेणेकामी तसेच विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेकरीता शाळा/ महाविद्यालय/शैक्षणिक संस्था यांचे थर्ड पार्टी ऑडीट करुन घेणेबाबत सुचना देण्यासाठी २८ एप्रिल रोजी  वाशी सेक्टर ६ मधील मराठी सहीत्य संस्कृती आणि कला मंडळ हॉल याठिकाणी शाळा/महाविद्यालय / शैक्षणिक संस्था यांचे प्राचार्य/मुख्याध्यापक/व्यवस्थापक यांची आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती.

सदर बैठकीदरम्यान परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निर्देशानुसार विदयार्थ्यांच्या सुरक्षितेकरीता विद्यालयांमार्फत करण्यात येत असलेल्या उपययोजनांचा आढावा घेवून विदयार्थ्यांच्या सुरक्षितेकरीता व लैंगीक अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध करण्याकरीता सविस्तर मार्गदर्शन करुन शालेय व्यवस्थापन कमेटी व स्थानीक पोलीस ठाणे यांनी आपसात समन्वय ठेवुन महाराष्ट्र शासनाव्दारे वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करावी तसेच शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक संस्था यांचे थर्ड पार्टी ऑडीट करुन स्थानिक पोलीस ठाणेस कळविणेबाबत उपस्थित प्राचार्य/मुख्याध्यापक/व्यवस्थापक यांना निर्देश दिले.

हे वाचा : तात्पुरत्या स्वरुपातील १६ अतिरिक्त न्यायालये, २३ जलदगती न्यायालयांना २ वर्षांची मुदतवाढ

या बैठकीकरीता परिमंडळ १. वाशी, नवी मुंबई मधील शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक संस्था यांचे एकुण १४९ प्राचार्य/मुख्याध्यापक/व्यवस्थापक उपस्थीत होते. सदर वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त तुर्भे व वाशी विभाग तसेच परि-१ अंतर्गत १० पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी हजर होते.

========================================================


========================================================