वनमंत्री गणेश नाईक यांचा सोमवारचा जनता दरबार रद्द

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 15 जून 2025
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा सोमवार,16 जून 2025 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई येथे होणारा ‘जनता दरबार’ तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. या जनता दरबाराची सुधारित तारीख आणि वेळ लवकरच जाहीर केली जाईल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे मंत्री कार्यालयाने कळविल्याची माहिती ठाणे जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आली आहे.
शहरातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी गणेश नाईक नियमितपणे जनता दरबाराचे आयोजन करीत असतात. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे उद्या होणारा जनता दरबार पुढे ढकलण्यात आल्याचे मंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
========================================================