नवी मुंबईत अवैध प्रवासी वाहतुकीविरुध्द मोहिम

नवी मुंबईत अवैध प्रवासी वाहतुकीविरुध्द मोहिम

नवी मुंबई,23 नोव्हेंबर 2016 / AV News Bureau :

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी परिवहन उपक्रमाच्या वाहतुकी पासून मिळणाऱ्या दैनंदिन उत्पन्नाचा आढावा घेतला असता सध्या दैनंदिन उत्पन्नात घट झाल्याचे निदर्शनास आले व त्याबाबत चर्चेअंती असे निदर्शनास आले की,

अवैध प्रवाशी वाहतुकीमुळे नवी मुंबई परिवहन सेवेच्या उत्पन्नामध्ये घट होत असल्याचा दावा नवी मुंबई महापालिका प्रशासानने नवी मुंबई पोलिसांच्यामदतीने अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात मोहिम सुरू केली आहे. त्यानुसार 21 व 22 नोव्हेंबर रोजी 57 खासगी वाहन चालकांविरोधात कारवाईक  करीत दंड वसूल करण्यात आला. या कारवाईचा सामान्य प्रवाशांनाही फटका बसला.

नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आता आपला मोर्चा अवैध प्रवासी वाहतुकीकडे वळविला आहे. याबाबत अवैध वाहतुक मोहीमेचा कृती आराखडा परिवहन व्यवस्थापक  शिरीष आरदवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  संजय डोळे, पोलीस उप आयुक्त अरविंद साळवे वाहतुक शाखा नवी मुंबई यांच्या अधिपत्याखाली तयार करण्यात आला आहे. त्यानुसार अवैध प्रवाशी वाहतुक विरुध्द दि.21/11/2016 पासून धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे.

21 आणि 22 नोव्हेंबर रोजी तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरुळ रे.स्टेशन, सिबीडी, किल्ले गावठाण या ठिकाणी एन.एम.एम.टी. बस थांब्यावरील बेकायदेशीर प्रवाशी वाहतुक करणाऱ्या खाजगी वाहना विरुध्द धडक मोहिम हाती घेऊन एकूण 57 खाजगी वाहन चालकांविरुध्द आरोपपत्र दाखल केले तसेच त्यांच्यावर गाडया जप्तीची व दंडात्मक कारवाई करण्यात आली यामध्ये इको, ओमनी, मॅक्सी कॅब, बोलेरो, झायलो, इरटिगा व बस इ.प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे.

या अवैध प्रवाशी वाहतुक  मोहिमेमुळे परिवहन उपक्रमाच्या वाहतुकीपासून मिळणाऱ्या दैनंदिन उत्पन्नात सरासरी 2 लाख रुपये इतकी वाढ झाली आहे. अशा प्रकारची मोहिम यापुढेही कायमस्वरुपी राबविण्यात येणार असल्याचे परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले.