पनवेलमधील वीज पुरवठा 27 डिसेंबरला बंद

पनवेल, 26 डिसेंबर 2016 /AV News Bureau :

 महावितरण कंपनीच्या पनवेल विभागातील २२ के.व्ही. कळंबोली तसंच २२ के.व्ही. जवाहर या वीज वाहिनींचा पुरवठा  २७ डिसेंबरला सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विद्युत पुरवठ्याबाबतचं तांत्रिक काम पूर्ण करण्यासाठी  हा निर्णय घेण्यात आला आहे.

२२ के. व्ही. कळंबोली या वीज वाहिनीवरील स्टील मार्केट केडब्ल्युसीचा भाग आदी परिसराचा वीज पुरवठा सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत बंद राहील.  कळंबोली कॉलनी व सेक्टंर १२, १३, १४, १५, १६ ई, १७, २० आदी परिसराचा वीज पुरवठा सकाळी १0 ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहील. तसंच २२ के. व्ही. जवाहर या वीज वाहिनीवरील कामोठे नोड आदी परिसराचा वीज पुरवठा सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहील,असं महावितरण कंपनीच्यावतीनं कळविण्यात आलं आहे.