29व्या अखिल भारतीय आरपीएफ ऍथलेटिक चॅम्पियनशिपचा पुण्यात समारोप

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, १४ ऑक्टोबर २०२२

मध्य रेल्वे आरपीएफने आयोजित केलेल्या 29व्या अखिल भारतीय आरपीएफ ऍथलेटिक चॅम्पियनशिप या 4 दिवसांच्या मेगा इव्हेंटचा आज मोठ्या दिमाखात समारोप झाला. 29व्या अखिल भारतीय ऍथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये 218 पुरुष आणि 95 महिलांनी विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.   मध्य रेल्वेचे महाव्यवस्थाप अनिलकुमार लाहोटी प्रमुख पाहुणे होते.  मीनू लाहोटी, अध्यक्षा, मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन याही याप्रसंगी अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

अनिल कुमार लाहोटीयांनी  सांगितले की, या स्पर्धेत सर्व विभागीय रेल्वेतील रेल्वे संरक्षण दलातील 313 खेळाडूंनी सहभाग घेतला ही अभिमानाची बाब आहे.  ते पुढे म्हणाले की, खेळ केवळ तंदुरुस्त ठेवत नाहीत तर सांघिक भावना देखील मजबूत करतात.  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना रेल्वेने नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि त्यांचा आदर केला आहे, असे त्यांनी व्यक्त केले.  विजेत्यांचे अभिनंदन करताना त्यांनी ही चॅम्पियनशिप स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाचे अभिनंदनही केले.

लाहोटी यांच्या हस्ते 16 सुवर्ण, 8 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह 38 पदकांसह पदकतालिकेत अव्वल राहिलेल्या दक्षिण रेल्वे संघाला विजेते चषक देण्यात आले.  मध्य रेल्वेला  9 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह 23 पदकांसह दुसऱ्या स्थानावरील उपविजेते चषक देण्यात आले.