आ. प्रशांत ठाकूर यांचा पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात सहभाग

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

पनवेल, ३ मे २०१९:

पाणी फाउंडेशनच्या वतीने पारनेर भागात सुरू असलेल्या अभियानात सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेऊन आपल्या कार्यकर्त्यांसह श्रमदान केले.

पारनेर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता  भासते. सातत्याने या तालुक्याला दुष्काळाच्या सावटाचा इतिहास आहे. त्यामुळे पारनेरचे अनेक कुटुंब नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई स्थायिक झाले आहेत. त्यापैकी बहुतांशी कुटुंब पनवेल परिसरात राहतात. मुंबईस्थित अनेक पारनेरकर आपल्या गावातील शिवार जलयुक्त व्हावे,  या दृष्टिकोनातून पाणी फाउंडेशन या अभियानात सहभागी झालेले आहेत.

शासकीय अधिकारी, कर्मचारी, वाहतूकदार, व्यापारी, आपल्या मूळ गावी जाऊन श्रमदान करतात. महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्तपाणी फाउंडेशन च्या वतीने राबविण्यात आलेल्या अभियानासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना पारनेर तालुक्यातील हरेश्वर येथे  निमंत्रित केले होते. या निमंत्रणाचा क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी स्वीकार केला आणि महाराष्ट्र दिनी पनवेल महापालिकेचे नगरसेवक संतोष शेट्टी, रायगड जिल्हा परिषद अमित जाधव, डॉ. संतोष जाधव, युवा नेता किशोर चौतमोल, विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच किशोर सुरते, प्रमोद भिंगारकर, विवेक होणं यांच्यासह पनवेल भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हरेश्वर येथील श्रमदानात सहभागी झाले. त्यांच्यासोबत स्थानिक ग्रामस्थ, मुंबईस्थित पारनेरकर, जलमित्र यांनी श्रमदान केले.

===============================================

इतर बातम्यांचाही मागोवा