प्रेक्षकांकडून ‘घुमा’ला पसंती

पुणे येथे रंगलेल्या पुणे आंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात ऑडियन्स चॉईस अँवार्ड  

 पुणे, 20 जानेवारी 2017/ AV News Bureau :

पुणे फिल्म  फौंडेशन व राज्य सरकार यांच्या वतीने दरवर्षी पार पडणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात(पिफ) महेश रावसाहेब काळे दिग्दर्शित घुमा या चित्रपटाने प्रेक्षकांच्या पसतीस उतरला. पंधराव्या महोत्सवात ऑडियन्स चॉईस अवॉर्ड घुमाने पटकावला.  फेस्टिव्हलचे अध्यक्ष जब्बार पटेल व चित्रपट अभ्यासक समर नखाते व परिक्षकांनी महेश काळे यास पुरस्काराने गौरविले.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणारा मानाचा संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार लेथ जोशी चित्रपटाने पटकावला.

यंदाचं पिफचं हे पंधरावे यावर्षी मराठी चित्रपटाच्या विभागातही चुरशीची स्पर्धा होती. पिफमध्ये झालेल्या कोथरुडमधील सिटी प्राईड व कँम्प येथील ऑयनॉक्सच्या दोन्ही शोला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध सिनेमागृहांमध्ये १२ तो १९  जानेवारी दरम्यान हा फेस्टिव्हल पार पडला.

  • प्रतिक्रिया –

घुमा हा माझा पहिलाच चित्रपट आहे.  फेस्टिवलदरम्यान घुमा प्रेक्षकांना आवडला. त्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. भविष्यात नक्कीच प्रेक्षक सिनेमागृहात चित्रपटास दाद देतील.

महेश काळे, दिग्दर्शक