नवी मुंबईत 1300 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

chabukswar dmc

नवी मुंबई, 9 फेब्रुवारी 2017/ AV News Bureau:

पर्यावरणाला व मानवी जीवनाला हानीकारक असणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबावा यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदार, व्यावसायिकांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून तब्बल 1300 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधित व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल करण्यात आला. एपीएमसी मार्केट परिसरात आजवरची सर्वात मोठी प्लास्टिक विरोधी मोहीम राबविण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.

परिमंडळ 1 विभागात अतिरिक्त आयुक्त (शहर) अंकुश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ 1 चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्या माध्यमातून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानांची तपासणी करून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठाच जप्त करण्यात आला आहे.

  • सीबीडी बेलापूर विभागात से. 11 येथील  मनोज वाईन्स, सागर रेस्टॉरन्ट, श्रेया स्नॅक्स सेंटर, झेरॉक्स सेंटर  यांच्याकडून प्रत्येकी 5 हजार रूपये दंड व 80 किलो 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
  • वाशी विभागात से. 17 येथील इकल ट्रेडिंग कंपनी व अनिल प्लास्टिक शॉप तसेच से.1 वाशी येथील टिळक मार्केट मधील न्यू बॉम्बे स्टोअर शॉप, चामुंडा सुपर मार्केट, आस्मा चिकन शॉप, छाया जनरल स्टोअर्स या दुकानांवर कारवाई करून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या व प्रत्येकी र. 5 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली

plastic 1plstic

  • तुर्भे विभागात से. 19 येथील स्वस्तीक प्लास्टो, जित ट्रेडिंग, भवानी ट्रेडर्स, पॅक मार्ट, शोभा ट्रेडिंग, मोमाई पुजा भांडार, शुभम ट्रेडिंग, डेली मार्ट या आठ दुकानदारांकडून प्रत्येकी 5 हजार रू. दंडात्माक रक्कम वसूल करण्यात आली व 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उपआयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या माध्यमातून परवाना विभागाकडून बेलापूर विभागातील 8, नेरूळ विभागातील 9, तुर्भे विभागातील 9, वाशी विभागातील 7, , कोपरखैरणे विभागातील 7, घणसोली विभागातील 14, ऐरोली विभागातील 12 व दिघा विभागातील 10 अशा एकूण  77 दूध डेअरी व्यावसायिकांकडून 353 किलो 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या तसेच रू. 1 लाख 40 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली.
  • plastic 2