24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान खो-खो स्पर्धा

नवी मुंबई, २१ फेब्रुवारी २०१७/AV News Bureau:

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 24 ते 26 फेब्रुवारी या काळात  कोपरखैरणे सेक्टर 8 येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या क्रीडांगणावर ‘नवी मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. 24 फेब्रुवारीला सायंकाळी 6.30 वाजता नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. तर 26 फेब्रुवारीला  सायंकाळी 7.30 वाजता  या स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.

ही  स्पर्धा पुरूष व महिला अशा दोन गटांत होणार आहे. दोन्ही गटांत प्रथम चार क्रमांकांना स्मृतीचिन्हांसह रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात येतील. याशिवाय उत्कृष्ट संरक्षक, उत्कृष्ट आक्रमक, उत्कृष्ट अष्टपैलू व प्रत्येक दिवसाचा मानकरी अशी प्रोत्साहनात्मक पारितोषिकेही देण्यात येणार असून एकूण 2 लाख 1 हजार इतक्या रक्कमेची पारितोषिके दिली जाणार आहेत.