नवी मुंबई महापालिकेस घनकचरा वर्गीकरण प्रणालीस राष्ट्रीय स्तरावर सादरीकरणाचा बहुमान

महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले सादरीकरण
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ३ जुलै २०२०

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ चा प्रारंभ नवी दिल्ली येथील निर्माण भवनमध्ये ऑनलाईन करण्यात आला व यावेळी ‘निर्मितीच्या स्थळी कचरा वर्गीकरण – घनकचरा व्यवस्थापनाची किल्ली (Segregation at source – key to Solid waste management)’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय वेबिनारमध्ये ‘निर्मितीस्थळी कचरा वर्गीकरण क्षेत्रातील अनुकरणीय कार्यप्रणाली (Best Practices in Source Sagregation)’ म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा वर्गीकरण कार्यप्रणालीचे राष्ट्रीय स्तरावर वेब सादरीकरण करण्याचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेस मिळाला. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत राबविण्यात येणा-या कचरा वर्गीकरण पध्दतीची सादरीकरणासह माहिती दिली.

अविरत वाटचाल : ३०० युनिट्सपर्यंतची विद्युत बिले माफ करा – भाजप
https://bit.ly/3goUFy3

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस देशात सातव्या व महाराष्ट्र राज्यात पहिल्या क्रमांकाचे मानांकन लाभलेले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० चा निकाल जाहिर होणे बाकी असून यावर्षी जाहिर झालेल्या कचरामुक्त शहरांच्या श्रेणीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस ५ स्टार रेटींग प्राप्त झाली असून ५ स्टार रेटींग प्राप्त करणा-या देशातील ६ शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे.

शहरात दररोज निर्माण होणा-या कच-याचे ओला, सुका असे वर्गीकरण निर्मितीच्या ठिकाणीच होत असल्याबद्दलची तसेच त्याचे संकलन, वाहतूक व शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जात असल्याबद्दलची सविस्तर माहिती देणारे सादरीकरण महापालिका आयुक्त मिसाळ यांनी या राष्ट्रीय वेबिनारमध्ये केले . याव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेस आपली कचरा वर्गीकऱण प्रणाली राष्ट्रीय स्तरावर इतरांसाठी अनुकरणीय म्हणून मांडण्याचा बहुमान मिळाला आहे.

====================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा