नवी मुंबईतील कांदळवन संरक्षण समितीचे पुनर्गठन

 मुंबई, 2 मार्च 2017/AV News Bureau :

नवी मुंबईतील  कांदळवन संरक्षणासाठी  विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीचे उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार पुनर्गठन करण्यात आला आहे. आता मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश करण्यात आले आहे.

पुनर्गठित समितीमध्ये विभागीय आयुक्त कोकण विभाग हे अध्यक्षपदी असतील. त्याशिवाय, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, अप्पर आयुक्त- नवी मुंबई महानगरपालिका, महाव्यवस्थापक-पर्यावरण व वने सिडको, विभागीय वन अधिकारी- मुंबई कांदळवन संधारण घटक, नवी मुंबई पर्यावरण संवर्धन समिती यांचे प्रतिनिधी, विभागीय आयुक्त कोकण भवन यांनी नामनिर्देशित केलेल्या आणि पर्यावरण क्षेत्रात काम केलेल्या अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी हे सदस्य म्हणून काम करतील, तर मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) मुंबई हे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत.