गाढी नदीच्या प्रदुषणाबाबत उपाययोजना करणार

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची माहिती

 मुंबई, 23 मार्च 2017/AV News Bureau:

पनवेलमधील गाढी नदीच्या प्रदुषणाबाबत तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत दिली.

पनवेल महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेले सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित आहे. मात्र शहरातील काही भागाच्या जोडण्या भुयारी गटार योजनेस जोडणे बाकी असल्याने काही क्षेत्रातील सांडपाणी या नदीत मिसळते. या भागातील भुयारी गटारांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येतील, असेही कदम यांनी यावेळी सांगितले.

आ.प्रशांत ठाकूर यांनी गाढी नदीचे पाणी सांडपाण्यामुळे प्रदुषित झाल्याबाबतचा प्रश्न विचारला होता.