साडे तीन हजार माशांचा समावेश असलेले सिंधुदुर्गातील फिश थिम पार्क

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • सिंधुदुर्ग, 17 सप्टेबर 2023
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात दाणोली जवळच्या केसरी फणसवडे इथे भारतातल्या  पहिल्या फिश थिम पार्कच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले आहे. ११ सप्टेंबर रोजी या फिश थीम पार्कचे उद्घाटन करण्यात आले.
या फिश थीम पार्कमध्ये विविध प्रकारचे रंगीत मासे तसेच गोड्या आणि खान्या पाण्यातले मासे, देशविदेशातील माशांच्या प्रजाती असे सुमारे साडेतीन हजार प्रकारचे मासे पाहायला मिळणार आहेत. फिश थीम पार्कमध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था तसेच छोटेखानी तळेही निर्माण करण्यात आले आहे.
या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव मिळणार आहे. त्याच बरोबर पार्कमध्ये बर्ड पार्क आणि फुलपाखरू गार्डन लवकरच खुल होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.  नैसर्गिक सौंदर्यासोबतच या जिल्ह्य़ाला जैवविविधताही लाभली आहे. वॉटर स्पोर्ट्स सोबतच आता पर्यटकांना रंगबिरंगी मासेही पाहायला मिळणार आहेत.
========================================================

 ========================================================