गणपती विसर्जन व ईदच्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत 28 व 29 सप्टेंबर रोजी अवजड वाहनांना बंदी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 28 सप्टेंबर 2023

दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन तसेच ईद ए मिलादच्या मिरवणुकींच्या पार्श्वभूमीवर कोणतीही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होवू नये यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 28 आणि 29 सप्टेंबर रोजी असे दोन दिवस अवजड वाहनांच्या वाहतुकीला तसेच वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली.

ही बातमी वाचा : Navi Mumbai Morbe Dam: जलपूजनाचा वाद चिघळला

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात साजरा करण्यात येणा-या गणेशोत्सव – 2023 च्या अनुषंगाने गणपती विसर्जनाच्यावेळी वाहतूक व गणपती मिरवणूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अवजड वाहनांना 28 सप्टेंबर रोजी (दहा दिवस आणि अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन) तसेच 29 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद हा सण असल्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व प्रकारच्या जड अवजड मालवाहतुक करणा-या वाहनांना शहराचे सर्व मार्गावरून मार्गस्थ होण्यास प्रवेश करण्यास आणि वाहने उभी (Park) करण्यास बंदी घालण्यात आली आहे ही बंदी दोन्ही दिवशी मध्यरात्री 12.9 वाजल्यापासून ते गणपती विसर्जन मिरवणुक व ईद ए मिलाद चे मिरवणुक संपेपर्यंत बंदी राहणार आहे.

ही बातमी वाचा : शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या नवीन मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

सदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही जीवनावश्यक वाहने पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, प्रवासी वाहतूक करणा-या सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही. ही अधिसूचना 28 सप्टेंबरपासून अमलात आणण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त काकडे यांनी दिली.

ही बातमी वाचा : गणपती विसर्जन (अनंत चतुर्थी) निमित्त 10 उपनगरीय विशेष रेल्वे सेवा

========================================================

========================================================

========================================================