कर्जमाफीबाबत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना भेटण्याची नाटके बंद करावीत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका 

मुंबई, 2 मे 2017/AV News Bureau:

शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना भेटण्याची नाटके बंद करावीत. शिवसेना सत्तेत आहे. त्यांनी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अन्यथा सत्तेतून बाहेर पडावे. शिवसेनेने राज्यातल्या जनतेला गृहीत धरू नये. राज्यातील जनता सुज्ञ असून ती योग्य वेळी शिवसेनेला धडा शिकवेल. भाजप इतकेच शिवसेनेचे मंत्रीही सत्तेचा उपभोग घेत आहेत त्यामुळे कर्जमाफीअभावी झालेल्या शेतक-यांच्या  हलाखीच्या परिस्थितीला तेही तितकेच जबाबदार आहेत,अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मी गेल्याच आठवड्यात सांगितले होते की तूर खरेदीत मोठा घोटाळा आहे. आता ते सिध्द झाले आहे. तूर खरेदीत 400 कोटींचा घोटाळा झाल्याचे आता उघड झाले आहे. सरकारने घोटाळेबाजांवर तात्काळ कारवाई करावी. यामध्ये काही सरकारी अधिकारी गुंतले असण्याची शक्यताही आहे.  या घोटाळ्यावरून राज्य सरकारचे हात भ्रष्टाचारात बरबटले असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.