78 जागांसाठी 418 इच्छुक

233 पुरूष तर 185 महिला उमेदवार रिंगणात

पनवेल, 11 मे 2017/AV News Bureau:

पनवेल महापालिका निवडणुक अधिक रंगू लागली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आज 154 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे 78 जागांसाठी आता 418 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये 233 पुरूष उमेदवार तर 185 महिला उमेदवार आहेत.

या निवडणुकीसाठी 621 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 49 जणांचे उमेवादीर अर्ज अवैध ठरले तर 572 जणांचे अर्ज वैध ठरले. यापैकी 154 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता 78 जागांसाठी 418 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

  • अवैध ठरलेल्या उमेदवारांचा तपशिल

1

  • वैध ठरलेल्या उमेदवारांचा तपशिल

2

  • उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांचा तपशिल

3

  • अंतिम उमेदवारांची संख्या

4