वेळेत मालमत्ता कर भरणाऱ्यांना सूट मिळणार

ठाणे, 22 मे 2017/AV News Bureau :

नागरिकांना सन 2017-18 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची बिलांची रक्कम भरणे सोयीचे जावे यासाठी ठाणे महापालिकेच्या कर भरणा केंद्र  27 व 28 मे या सुट्टीच्‍या दिवशीही सुरु ठेवण्यात येणार आहेत.

सन 2017-2018 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची बिले प्रभाग निहाय तयार करुन नागरिकांना वितरीत करण्यात आलेली आहेत. जे नागरिक संपूर्ण थकबाकीसह पहिल्या सहामाहीच्या बिलाच्या रक्कमेसह दुस-या सहामाहीच्या बिलाची रक्कम दिलेल्या वेळेत भरतील. त्यांना दुस-या सहामाहीच्या बिलाच्या रक्कमेवर विशेष सूट देण्‍यात येणार असल्याचे ठाणे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.

देण्यात येणारी सूट

  • 31 मे, 2017 पर्यंत मालमत्ता कर भरल्यास दुस-या सहामाहीच्या रक्कमेवर 10%
  • 1 जून ते 30 जून पर्यंत कर भरल्‍यास 4%
  • 1 जुलै ते 31 जुलै पर्यंत कर भरल्‍यास 3%
  • 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत कर भरल्‍यास 2%