पनवेल, भिवंडी, मालेगावमध्ये सरासरी 55 टक्के मतदान

मुंबई, 24 मे 2017/AV News Bureau:

भिवंडी- निजामपूर, मालेगाव आणि पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी 55 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली.

नगरपरिदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोट निवडणुकांसाठी सरासरी 73.4 टक्के; तर धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 42 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असेही त्यांनी सांगितले.

तीन महापालिकांसाठी झालेले मतदान

  • भिवंडी- निजापूर महानगरपालिकेसाठी 53 टक्के
  • मालेगाव महानगरपालिकेसाठी 60 टक्के
  • पनवेल महानगरपालिकेसाठी 53 टक्के

नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी झालेले मतदान

  • नागभीड(जि. चंद्रपूर)  नगरपरिषदेसाठी 71.5 टक्के
  • नेवासा(जि. अहमदनगर) नगरपंचायतीसाठी 81.4 टक्के
  • रेणापूर(जि. लातूर) नगरपंचायतीसाठी 76.7 टक्के
  • शिराळा(जि. सांगली) नगरपंचायतीसाठी 87.5 टक्के
  • एकूण सरासरी 77.9 टक्के मतदान

पोटनिवडणुकांसाठी झालेले मतदान

  • जव्हार, श्रीवर्धन, चिपळूण, कसई-दोडामार्ग, धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु., औसा आणि अचलपूर या 7 नगरपरिषद/ नगरपंचायतींतील एकूण 11 रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी सरासरी 61 टक्के मतदान झाले.
  • नगरपरिषदा आणि नगरपरिषदांच्या सार्वत्रिक आणि पोट निवडणुकांसाठी एकत्रित सरासरी 73.4 टक्के मतदान झाले.
  • धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीदेखील आज मतदान झाले. एकूण दहा जागांसाठी सरासरी 42 टक्के मतदान झाले.